विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : ३ जानेवारी २०२६ रोजी, राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तथा राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका सौ. अनिता टोंगे मॅडम उपस्थित होत्या तर कु. शुभांगी लांडे मॅडम, प्रभुदास नगराळे सर व तुषार घाणे सर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाप्रसंगी सौ. टोंगे मॅडम व कु. लांडे मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रतिश लखामापुरे सर यांनी तर आभार प्रदर्शन तुषार घाणे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विध्यार्थी, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभाग दर्शवीला....


