विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी पंचायत समिती अंतर्गत मौजा मानकी येथिल ग्राम पंचायत कार्यालय येथे दिनांक ०३ जानेवारी २०२६ रोज शनिवार ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ठिक सकाळी ८:३० वाजता साजरी करण्यात आली.
यावेळी सरपंच कैलास पिपराडे, उपसरपंच शंकर माहुरे, ग्राम पंचायत सदस्य नानाजी पारखी, सदस्या सौ. इंदिरा परशुराम पोटे , पोलीस पाटील सौ. मिनाक्षी सुजीत मिलमिले, अंगणवाडी सेविका सौ. बेबिताई मालेकर, सेविका सुनिता पत्रकार, ग्राम पंचायत कर्मचारी अविनाश सरवर, अमर खुसपुरे, प्रदिप मालेकर व बालगोपाल उपस्थित होते.

