ठळक बातम्या

    वणी पब्लिक स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

     वणी: वणी पब्लिक स्कूल येथे आज शनिवार, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने आयोजित अभिवादन कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, सामाजिक समता व महिला सबलीकरणातील अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला.

    कार्यक्रमात जेष्ठ शिक्षिका सौ. अश्लेषा जेणेकर व सौ. अनुपाली खोब्रागडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीसाठी असलेला संदेश त्यांनी प्रभावीपणे मांडला. याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अभय पारखी सर यांनी सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. वंदना बाविस्कर मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन तेजस्विनी झाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

    या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, शिक्षणाचे महत्त्व आणि महान स्त्री नेतृत्वाबद्दल आदरभाव निर्माण झाला.



    Photo