विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज शनिवार, दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी माळी समाज बहुउद्देशीय संस्था, वणी यांच्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ भास्कर वाढई कॉम्प्लेक्स, बस स्टॉप समोर, सरकारी दवाखाना रोड, वणी येथे दुपारी ३ वाजता उत्साहात पार पडला. सदर कार्यालयाचे उद्घाटन मा. माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय निलेशजी चौधरी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ, आत्राम मॅडम, माननीय विजय पिदुरकर, राकेश बुग्गेवार, संजय पिंपळशेंडे, सौ, सोनाली निमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात श्री. भवानी भाऊ मांदाडे यांनी सांगितले की, माळी समाजाचे संघटन बळकट करणे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय उन्नती साधणे, समाजाच्या विविध समस्यांवर चर्चा व मार्गदर्शन करणे तसेच शिक्षण, रोजगार, विवाह व सामाजिक सुधारणांसाठी एकत्र येऊन समाजाच्या हक्कांसाठी लढा देणे, या उद्देशाने या कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. हे कार्यालय माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिशा देणारे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भव्य शुभारंभ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.




