विदर्भ वार्ता|प्रतिनिधी
वणी : क्रांतीज्योती "सावित्रीबाई फुले जयंती" निमित्य आज शनिवार, दिनांक ०३ जानेवारी २०२६ रोजी "माळी समाज बहुउद्देशिय संस्था, वणी कार्यालयाचा" शुभारंभ भास्कर वाढई कॉम्प्लेक्स, बस स्टॉप समोर, सरकारी दवाखाना रोड, वणी ला दुपारी २ वाजता भव्य शुभारंभ होणार आहे.
सदर या कार्यालयाची निर्मिती माळी समाजाचे संघटन, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय उन्नती साधण्यासाठी, समाजाच्या समस्यांवर चर्चा , मार्गदर्शन करण्याकरिता आणि समाजाच्या हक्कांसाठी लढा देण्याकरिता, जसे की शिक्षण, रोजगार, विवाह आणि सामाजिक सुधारणांसाठी एकत्र येण्यासाठी. ह्या कार्यालयाची मदत समाजाला दिशा देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक केंद्र म्हणून हे कार्यालय उपयुक्त ठरणार आहे. तरी या कार्यालयाच्या शुभारंभाकरिता समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

