ठळक बातम्या

    युवासेनेचे पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक धरणे आंदोलन आमदार संजय देरकर यांचा आठ दिवसांचा अल्टीमेटम

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी परिसरात सर्रास सुरू असलेल्या गुटखा व सुगंधित तंबाखू तस्करीविरोधात ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून युवासेनेच्या वतीने वणी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

    महाराष्ट्र शासनाने कायद्याने बंदी घातलेली सुगंधित तंबाखू व गुटखा वणी शहर व परिसरात खुलेआम विक्रीस असल्याचे निदर्शनास येत असताना, वणी पोलीस प्रशासन केवळ दिखाऊ कारवाई, बनावट पंचनामे करून तस्करांना पाठीशी घालत असल्याचे गंभीर आरोप युवासेनेच्या वतीने करण्यात आले. पंचशील नगर परिसरात सुमारे एक महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या कथित बनावट कारवाईतील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, ही या धरणे आंदोलनाची प्रमुख मागणी होती.

    या आंदोलनास शिवसेना जिल्हा प्रमुख संजय निखाडे, राजू तुराणकर, आयुष ठाकरे, बंडू चांदेकर, दिलीप काकडे, गणपत लेडांगे, सुधीर थेरे, पुरुषोत्तम बुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप भोयर, लढा संघटनेचे प्रविण खानझोडे, नगरसेवक अजय धोबे, शत्रुघ्न मालेकर, अनिकेत बदखल, गुलाम रंगरेज, दत्ता बोबडे, समीर लेनगुरे, अभय चौधरी, मिलिंद बावणे, विनोद दुमणे, सुरेश शेंडे, अजय चन्ने, सचिन पचारे, किशोर ठाकरे, संतोष कुचनकर, संदीप गोहकार, विजय अवताडे, अमृत फुलजले, श्री. बदखल, आशिष रिंगोले, अमोल झोटिंग, मोरेश्वर उज्वलकर, चेतन उलमले, गुड्डू घाटोळे, राजू पाटील, मनीष बत्रा, विशाल देवतळे, शंकर देरकर, संस्कार हेपट, रवी कांबळे, अक्षय लाडे, रोशन जाधव, श्री. धोटे, मोहम्मद अन्सार, योगेश उपरे, गणेश काळे, नारायण गोडे, अभिजीत चालकुळे यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र आक्रोश व्यक्त केला.

    आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी व वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार संजय देरकर यांनी पोलीस प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देत, आठ दिवसांच्या आत गुटखा तस्करीसह सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करून संबंधित तस्करांना अटक करण्यात यावी, अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम अल्टीमेटम दिला.

    पोलीस अधिकाऱ्यांनी लेखी व तोंडी स्वरूपात कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर २६ जानेवारी रोजी छेडण्यात आलेले हे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले, अशी माहिती युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी दिली.



    Photo