ठळक बातम्या

    वणी येथे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय नेत्यांची भावपूर्ण आदरांजली

     


    विदर्भ वार्ता|प्रतिनिधी

    वणी : राज्यातील राजकारणात आपला ठसा उमटवणारे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना वणी शहरातील टिळक चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर दिं. २९/१/२०२६ ला सायंकाळी ७ वाजता सर्वपक्षीय नेत्यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. त्यांच्या निधनाने राज्याने एक अनुभवी, कर्तव्यदक्ष व जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने झटणारा नेता गमावल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

    आदरांजली सभेत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्व. अजितदादा पवार यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याची आठवण करून देत अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

    यावेळी स्थानिक आमदार संजय देरकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय चोरडिया, राजू उंबरकर, ॲड. देविदास काळे, दिनकर पावडे, राकेश खुराणा, आशिष मोहितकर, संजय पिंपळशेंडे,रवी बेलुरकर, फाल्गुन गोहकर,संतोष डंबारे, श्रीकांत पोटदुखे, प्रमोद निखोरे, पवण ऐकरे, विनोद ढूमने तसेच पत्रकार बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. निलेश चौधरी यांनी केले. आदरांजली कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व. अजितदादा पवार यांना अखेरचा निरोप दिला.



    Photo