ठळक बातम्या

    ४० वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेल्या नाग मंदिराने घेतला मोकळा श्वास...!

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : वणी शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील टुटी कमान चौक येथे असलेले नाग मंदिर तब्बल ४० वर्षांपासून अतिक्रमणामुळे झाकले गेले होते. मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने भाविकांना दर्शनासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.


    मात्र आता मंदिराने अक्षरशः मोकळा श्वास घेतला आहे. न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष दिपक छाजेड व सचिव परशुराम पोटे यांच्या पुढाकाराने मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवून स्वच्छता व सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे परिसर खुला, स्वच्छ आणि आकर्षक बनला असून भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


    या कार्यासाठी न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन, श्री. दिपक मत्ते (सरपंच, पिंपळगाव, बोरगाव-जुनाड) तसेच जयशजी चोरडिया यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे हे काम अल्पावधीत पूर्ण होऊ शकले.


    महाशिवरात्रीच्या निमित्ताने सायंकाळी ५ वाजता प्रभाग क्रमांक १० चे नवनिर्वाचित नगरसेवक व आरोग्य सभापती श्री. अनिल चिंडालिया, जयश चोरडिया तसेच दिपक छाजेड, राजु धावंजेवार,राजु जयस्वाल यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यांत आली.


    या कार्यक्रमास नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन चे सचिव परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, महादेव दोडके, विशाल ठोंबरे, संजय चिंचोलकर यांच्यासह न्यूज मिडिया पत्रकार असोसिएशन च्या सदस्यांचे सहकार्य लाभले.









    Photo