विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : मा. हंसराज भैया अहीर, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार तथा अध्यक्ष ओ.बी.सी. आयोग भारत सरकार यांच्या संकल्पनेतून मोफत वैद्यकीय फिरते चिकित्सा शिबिराचे आयोजन दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता लालगुडा चौफुली येथे करण्यात आले.
महाशिवरात्रीनिमित्त शिरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या सुमारे १५० नागरीकांनी, तसेच लालगुडा व वाघधरा या गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन व उपचार देण्यात आले.
या शिबिराचे आयोजन पवन ऐकरे (भारतीय जनता पार्टी, यवतमाळ जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष) यांच्या पुढाकारातून करण्यात आले. कार्यक्रमास दिनकर पावडे, अनंता बोढे, वाघधरा येथील सरपंच शाम तराडे, नेताजी भोयर, विनोद पचकटे, बंडू टेकाम, अक्षय लोडे, राहुल आत्राम, प्रशांत डाहपके, लालगुडा येथील उपसरपंच निलेश कोरवते, पवन बोबडे, संजय चिंचोलकर तसेच डॉ. जयश्री पवन ऐकरे यांची उपस्थिती होती.
शिबिरानंतर उपस्थित नागरिकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.









