विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी: येथील वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणारे, आधुनिक काळातील संत, समाज सुधारक व स्वच्छतेचे पुजारी संत गाडगे महाराज यांची 150 वी जयंती साजरी करण्यात आली . शाळेचे प्रभारी प्राचार्य श्री.सतिश बाविस्कर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी समूहगीत, नृत्य व भाषणातून
गाडगेबाबाविषयीची माहिती दिली.श्री.बाविस्कर सर यांनी आपल्या भाषणातून मुलांसमोर गाडगेबाबांचे जीवन चरित्राविषयी माहिती दिली. गाडगे महाराज ज्या गावात जात, तिथे आधी हातात झाडू घेऊन रस्ते आणि नाल्या स्वच्छ करीत."गाव स्वच्छ झालं की मन स्वच्छ होत असे म्हणत". त्यांनी पंढरीच्या विठ्ठलाला माणसात शोधलं. आणि मूर्ती पूजेपेक्षा माणसाची सेवा श्रेष्ठ मानली, देव दगडात नाही तर भुकेल्या माणसात असतो, असे मार्गदर्शन केले.
"भुकेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, उघड्यांना वस्त्र,गरिबांना शिक्षण, आजारी लोकांना औषधोपचार, हीच खरी ईश्वर सेवा"असा गाडगे महाराजांचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. हा कार्यक्रम शितल उलमाले मॅडम, सौ संतोषी ताजने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.संचालन विद्यार्थि निकुंज आवारी तर आभार प्रदर्शन विद्यार्थी नोक्ष थाटे याने केले.
कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शाळेचे इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.






