विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : वणी शहरातील ब्राम्हणी चौक, निळापूर रोड येथे आज दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास दोन ट्रकांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही ट्रक निळापूर रोडवरून विरुद्ध दिशेने येत असताना ब्राम्हणी चौकाजवळ अचानक समोरासमोर धडकले. धडकेची तीव्रता मोठी असल्याने एका हायवा ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत वाहतूक सुरळीत करण्यास सहकार्य केले. दोन्ही ट्रक आप आपल्या मार्गाने निघून गेले.
या अपघातामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

