विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी : राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी 'लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी कायदा' येेत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तात्काळ संमत करावा, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने २० फेब्रुवारी या दिवशी उपविभागीय अधिकारी कार्यालय मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार श्री. उल्हास निमेकर यांनी निवेदन स्वीकारले.
हे निवेदन देण्यासाठी शहरातील विविध महिला संघटनांनी आपला सक्रिय पाठिंबा दर्शवत सहभागी झाल्या.
महिलांवरील अत्याचार आणि फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कठोर कायदा असणे आवश्यक आहे, अशी आग्रही भूमिका हिंदू जनजागृती समितीने मांडली आहे. या निवेदनाद्वारे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील विविध महिला संघटना, सामाजिक संस्था, अध्यात्मिक आणि हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"आपल्या भगिनींच्या सुरक्षेसाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी हा लढा आवश्यक आहे," असे मत सनातन संस्थेच्या सौ. कविता आस्वले यांनी व्यक्त केले. यावेळी लव्ह जिहाद कायदा राज्यात तत्काळ लागु करण्याची आग्रही मागणी रणरागिणी शाखेच्या सौ. सरिता कोंडावार यांनी केली. निवेदन देते वेळी भाजपाचे श्री. राजूभाऊ वाघमारे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अनुराग काठेड, आरती मंडळाचे सर्वश्री अर्जुन वैद्य, शंकर झाडे, आर्यन हर्षवाल भाजपा महिला गटाच्या सौ. दिपाली देहारकर, सौ. पुष्पा चिडे, सौ. लीलाताई इंदोलिया, सौ. रजनीताई राजूरकर, सनातन संस्थेच्या सौ. कविता आस्वले, मंदा पारखी, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. सरिता कोंडावार, श्री. लोभेश्वर टोंगे या पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने हिंदु महिला उपस्थित होत्या.


