ठळक बातम्या

    मारेगाव २२० केव्ही उपकेंद्रासाठी निधीला हिरवा कंदील; माजी आमदार संजय रेड्डी बोदकुलवारांच्या पाठपुराव्याला यश

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : मारेगाव येथे २२० केव्ही विद्युत उपकेंद्र उभारण्यासाठी अखेर निधीला हिरवा कंदील मिळाला असून तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जात आहे. भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी यासंदर्भात केलेल्या निवेदनानंतर माजी आमदार संजय रेड्डी बोदकुलवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याची माहिती देण्यात आली.

    मारेगाव परिसरात वाढती वीज मागणी, औद्योगिक विकासाची गरज तसेच शेतीसाठी दर्जेदार वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने २२० केव्ही उपकेंद्राची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. यासाठी संबंधित विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले होते.

    निवेदन देताना माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुलवार, तालुका सरचिटणीस भाजपा श्री. प्रशांत नांदे, उद्योजक आघाडी अध्यक्ष भाजपा श्री. प्रविण बोथले तसेच युवा मोर्चा सचिव भाजपा श्री. रविंद्र टोंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    या उपकेंद्राच्या उभारणीमुळे मारेगाव तालुक्यातील नागरिकांना स्थिर व दर्जेदार वीजपुरवठा मिळणार असून औद्योगिक गुंतवणुकीलाही चालना मिळणार आहे. तसेच वारंवार होणारे व्होल्टेज चढ-उतार व लोडशेडिंगची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    तालुक्यातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत माजी आमदार संजय रेड्डी बोदकुलवार व भाजपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.




    Photo