ठळक बातम्या

    कळमना खुर्द येथे शिवजयंतीनिमित्त फिरते वैद्यकीय शिबिर; १०० नागरिकांनी घेतला लाभ

     

    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : कळमना खुर्द दि. १९ फेब्रुवारी २०२६ ला शिवजयंतीच्या निमित्ताने कळमना खुर्द येथे फिरते वैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सुमारे १०० नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराचा लाभ घेतला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे ओबीसी यवतमाळ जिल्हाध्यक्ष पवन एकरे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. “आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून आपल्या आया-बहिणींचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाच्या आचरणात उतरला पाहिजे,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

    या शिबिरात डॉ. मनोज कुमार व डॉ. जयश्री पवन एकरे यांनी नागरिकांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला प्रशांत धापके, राहुल क्षीरसागर, मंगेश येटे, कैलास धांडे, विठ्ठल पेंदोर, सचिन ढूमणे तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीचे
    पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित या सामाजिक उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळाला असून कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



    Photo