विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी: येथील वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य श्री.सतिश बाविस्कर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जेष्ठ शिक्षक श्री.मंगल तेलंग उपस्थित होते. बाविस्कर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून छत्रपतींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला.महाराजांच्या शौर्य पराक्रमाच्या व स्वराज्य अबाधित कसे ठेवता येईल याविषयी माहिती देऊन आता आपण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहीजे असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे संचालन शितल काळे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेच्या जेष्ठ शिक्षिका सौ.अश्लेषा जेणेकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
तसेच राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशा.आय.टि.आय.चे प्राचार्य श्री.सिद्धांत तेलतुंबडे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अभय पारखी होते.
याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी महाराजांचे प्रतिमेला फुले वाहुन वंदन केले.कार्यक्रमाचे संचालन प्रभुदास नगराळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिश लखमापुरे यांनी मानले.




