ठळक बातम्या

    महाशिवरात्रीनिमित्त शिरपूर येथील शिवमंदिरात हंसराज भैय्या अहीर यांचे दर्शन व प्रार्थना

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी-शिरपूर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आज दि. १५ फेब्रुवारी रोजी मा. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व भारत सरकार ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहीर यांनी वणी तालुक्यातील शिरपूर येथील प्राचीन शिवमंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शिवचरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना केली.

    महाशिवरात्री यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दर्शनानंतर मा. अहीर यांनी उपस्थित भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत यात्रोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

    याप्रसंगी श्री. तारेंद्र बोर्डे, श्री. दिनकर पावडे, श्री. पवन एकरे, प्रदीप जेऊरकर, नेताजी भोयर, शाम तराळे, अनंता बोढे, राहुल आत्राम, संजय चिंचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.









    Photo