विदर्भवार्ता|प्रतिनिधी
वणी: येथील वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे प्रभारी प्राचार्य श्री बाविस्कर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी भाषणे, नृत्य, गीत तसेच वेशभूषा
इत्यादी कृतीद्वारे आपला आनंद व्यक्त केला. श्री बाविस्कर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्त्रियांनी स्वकष्टाने कशाप्रकारे प्रत्येक क्षेत्रात आपले अग्रस्थान तयार केले आहे, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव श्री ओमप्रकाशजी चचडा व सदस्य श्री विक्रांतजी चचडा यांनी महिला दिनानिमित्त सर्व शिक्षिका तसेच विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन शाळेचे विद्यार्थिनी शुभ्रा मत्ते हिने केले. तर आभार प्रदर्शन श्रावणी संदुरकर हिने केले. हा कार्यक्रम श्री योगेश डेंगळे सर, श्रेया .... मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. शाळेचे इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.




