ठळक बातम्या

    “स्वच्छतेच्या चौकटीत वणी आगार; ‘बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान’ सर्वेक्षणात उत्साहाची झलक”

     


    विदर्भवार्ता|प्रतिनिधी

    वणी : स्वच्छता ही केवळ मोहीम नसून संस्कार बनत चालल्याचे चित्र वणी आगारात पाहायला मिळाले. दिनांक २७ मार्च २०२६ रोजी ‘बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान’ अंतर्गत चौथे स्वच्छता सर्वेक्षण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

    या वेळी आगार परिसरात स्वच्छता, प्रवासी सुविधा आणि व्यवस्थापनाच्या प्रत्येक घटकाची बारकाईने पाहणी करण्यात आली. नांदेड येथील विभाग नियंत्रक तथा यंत्र अभियंता अभिजीत कोरटकर यांनी स्वतः उपस्थित राहून संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेच्या निकषांची काटेकोर तपासणी करण्यात आली.


    कार्यक्रमात बसस्थानक प्रमुख लता मुळेवार, प्रभाकर कोरेवार, पत्रकार राजू धावंजेवार तसेच ‘प्रवासी मित्र’ म्हणून परशुराम पोटे यांची उपस्थिती विशेष ठरली.

    वणी आगार प्रशासनाने स्वच्छ, सुटसुटीत आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर वातावरण निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या सर्वेक्षणामुळे स्वच्छता उपक्रमाला नवी ऊर्जा मिळून आगामी काळात आगार अधिक आदर्श बनण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



    Photo