ठळक बातम्या

    वणीत ‘शिवकालीन ज्ञान संवर्धन व आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर’चे आयोजन....

     तरुणांना ऐतिहासिक वारसाची ओळख...


    सेल्फ डिफेन्स, शस्त्रकला व व्यक्तिमत्व विकासावर भर; २० एप्रिलपासून २८ जूनपर्यंत नगर भवन येथे मोफत प्रशिक्षण.


    विदर्भवार्ता । प्रतिनिधी 

    वणी - शहरातील युवक-युवतींमध्ये शौर्य, शिस्त आणि ऐतिहासिक परंपरेची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने शिव आनंद बहुउद्देशीय संस्था, रॉयल फाउंडेशन व वणी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवकालीन ज्ञान संवर्धन व आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर २० एप्रिल ते २८ जून २०२६ या कालावधीत दररोज दुपारी ते सायंकाळी या वेळेत नगर भवन (कल्याण मंडप), आंबेडकर चौक, वणी येथे पार पडणार आहे.

         या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना सेल्फ डिफेन्स (मार्शल आर्ट), व्यक्तिमत्व विकास, शिवचरित्र व शंभूराजे विचार कार्यशाळा यांसोबतच लाठी, काठी, तलवार, दांडपट्टा, भाला, दोरखंड व नॉन चोक यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढून शारीरिक व मानसिक बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.


     विशेष म्हणजे, हे शिबिर ५ वर्षांवरील मुला-मुलींसाठी पूर्णतः मोफत असून, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

         या उपक्रमासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून कु. तेजस्विनी राजू गव्हाणे कार्यभार सांभाळणार आहेत. तसेच शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी कु. तेजस्विनी गव्हाणे (९५१८७६४७५१) व राजू गव्हाणे (९७६४२५३२५३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

         शिव-आनंद काठी-काठी ग्रुप, वणी यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमामुळे वणीतील तरुणांमध्ये शौर्यपरंपरेची जपणूक होऊन, स्वसंरक्षणाची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.



    Photo