विदर्भवार्ता - प्रतिनिधी
वणी- येथिल सर्वपरिचित वणी पब्लिक ज्यु.कॉलेजने आज लागलेल्या 12 वी परिक्षेच्या निकालात दरवर्षिप्रमाणे याहीवर्षी घवघवीत यश संपादन केले.यामध्ये विज्ञान शाखेने 98.18℅ तर वाणीज्य शाखेने 70℅ यश संपादन केले.कॉलेजचा एकुण निकाल 93℅ लागला आहे.विज्ञान शाखेत कु.हर्षदा राजु आवारी हिने 85.67℅ गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला,विनय वासुदेव पाटीदार याने 81.50℅ गुण घेऊन द्वितीय तर कु.सिद्धि पुरूषोत्तम गोहोकार हिने 81℅ गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.तसेच वाणीज्य शाखेत पार्थ अजय लाल याने 75.50℅ गुण घेऊन प्रथम क्रमांक तर कु.श्रावणी संजय वाळके हिने 73.67℅ गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला.संस्थेचे सचिव मा.ओमप्रकाशजी चचडा,संचालक मंडळ सदस्य मा.विक्रांत चचडा व प्राचार्य आष्लेषा जेनेकार यांनी प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


