ठळक बातम्या

    विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची संस्कृती रुजवणे ही काळाची गरज. – संजीवरेड्डी बोदकुरवार

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी:आजचा धावपळीच्या जीवनात दिवसेंदिवस सगळीकडे वाचनाची संस्कृती लोप पावली आहे. ज्यांना बालकांवर संस्कार करायचे आहे त्या पालकांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल दिसत आहे. त्यामुळे या मुलांवर जे सहज संस्कार व्हायला पाहिजे ते होत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची संस्कृती रुजवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी नगर वाचनालयातर्फे जाणीवपूर्वक बालवाचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. असे प्रतिपादन माजी आमदार तथा नगर वाचनालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार उद्घाटक म्हणून बोलत होते. 

         विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. त्यांच्या धान्याच्या  कक्षा रुंदावल्या पाहिजे. यासाठी नगर वाचनालय वणी च्या वतीने 1 मे ला महाराष्ट्र दिनी बालवाचन  सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्रा. अभिजित अणे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्नेहलता चुंबळे, सुनील वाटेकर, वैजनाथ खडसे उपस्थित होते. 

           कार्यक्रमाची सुरुवात स्नेहलता चुंबळे यांच्या महाराष्ट्र गीत व बाल गीताने झाली. त्यानंतर अतिथीनी वाचनाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. 

    अध्यक्षीय भाषणात प्रा अणे यांनी बोधप्रद गोष्ट सांगून वाचाल तर वाचाल हा संदेश दिला. दिनांक 1 ते 7 मे पर्यंत चालणाऱ्या या बालवाचन सप्ताहात विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, डॉ. सुवर्णा चरपे, शेखर वांढरे , स्नेहलता चुंबडे, सुनील वाटेकर, वैजनाथ खडसे, प्रवीण सातपुते अशा विविध मान्यवरांचे उद्बोधन  लाभणार  आहे. 

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले.आभार प्रदर्शन संचालक अर्जुन उरकुडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार, कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले.



    Photo