ठळक बातम्या

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी विमा पावतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन-विजय पिदुरकर

     विजय पिदुरकर यांचा शेतकऱ्यांना 8 में 2026 ला तहसील कार्यालय वणी येथे दुपारी 4 वाजता बैठकीत सहभागी होण्याचा आग्रह


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत हंगाम २०२५-२६ मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तालुकास्तरीय पिकविमा तक्रार निवारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दिनांक ८ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजता तहसील कार्यालय, वणी येथे होणार आहे.

    सदर समिती ही शासन निर्णयानुसार मा. तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या संदर्भात मा. जि.प. सदस्य विजय पिदुरकर यांनी यापूर्वी पत्राद्वारे तक्रार नोंदवली होती.

    तसेच, तालुका कृषी अधिकाऱ्यांना संबंधित प्रकरणी पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असून, संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून बैठकीचे आयोजन व अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

    दरम्यान, वणी तालुक्यातील हंगाम २०२५-२६ मधील पिक विमाधारक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ८ मे रोजी होणाऱ्या बैठकीस आपल्या विम्याची पावती घेऊन स्वतः उपस्थित राहावे, असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी केले आहे.

    या बैठकीत शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून त्यांचे शंकानिरसन करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.



    Photo