विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी - देशात नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील विजयाच्या पार्श्वभूमीवर वणी शहरात भाजपाच्या वतीने उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी सायंकाळी सुमारे ६:३० वाजता भाजपचे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत तसेच एकमेकांना मिठाई दिसून आला. ‘भारत माता की जय’ व ‘भाजपा जिंदाबाद’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. या विजयाच्या निमित्ताने आगामी काळात पक्ष अधिक बळकट करण्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, माजी पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, रवी बेलुरकर, प्रा. महादेव खाडे, बंडू चांदेकर, शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी, तालुका अध्यक्ष प्रदीप जेऊरकर, सौ. मीराताई पोतराजे, नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम, उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार, अनिल चिंडालीया, लवलेश लाल, तसेच भाजपाचे सर्व नगरसेवक, यांच्यासह पवन ऐकरे, संतोष डंभारे, अंकुश बोढे, , विश्वजीत ठाकूरवार , आशिष डंभारे, विनायक ढवस ,नेताजी भोयर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

