ठळक बातम्या

    एकजुटीची ताकद; खरबडा ग्रामस्थांनी साधला विकासाचा नवा टप्पा

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी - झरी तालुक्यातील ग्राम पंचायत खरबडा येथे गेल्या तब्बल चार वर्षांपासून बंद पडलेला गावातील पाणी फिल्टर अखेर पुन्हा सुरू करण्यात आला असून, यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध झाल्याने ही बाब गावासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

    या उपक्रमासाठी समाजसेवक श्री अतुल पाटील आणि श्री कार्तिक बोरगमवार यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली मणिकंठा मोरेवार, प्रमोद मोरेवार, सागर मच्चावार, चिंटू मेश्राम, रोहित मोरेवार, तिरुपती मोरेवार, विठ्ठल आईटवार, महेश येंबावर आदींच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला.

    गावातील नागरिकांना आता पुन्हा एकदा स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या कामामुळे गावात एकजुटीची भावना दृढ झाली असून, समाजभावनेचा आदर्श देखील निर्माण झाला आहे.

    सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झाले असून, ग्रामस्थांकडून सर्व संबंधितांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन करण्यात येत आहे.

    गावाच्या विकासासाठी एकत्र येणं, हीच खरी प्रगतीची वाट आहे,” हे या उपक्रमातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.



    Photo