ठळक बातम्या

    पालकमंत्री संजय राठोड यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त वणीत ५६ वृक्षांचे रोपण; विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करून युवा सेनेचा प्रेरणादायी उपक्रम

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : दि. ३० जून २०२६ ला शिवसेना नेते तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त  युवा सेना, वणी यांच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी येथे तब्बल ५६ वृक्षांचे रोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. याचबरोबर लालगुडा जिल्हा परिषद शाळा तसेच इतर शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांचे वाटप करून ज्ञानदानाचाही उपक्रम पार पडला.

    हा उपक्रम शिवसेना नेते आशिषभाऊ खुलसंगेतालुकाप्रमुख प्रसादभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात खेमराज महाराज (पिपरीवाले) यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली. या उपक्रमाचे आयोजन युवा सेना लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा यांनी केले.

    यावेळी बोलताना विक्रांत चचडा यांनी सांगितले की, "आशिषभाऊ खुलसंगे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबवून समाजहिताची चळवळ अधिक बळकट करण्यात येईल."

    या प्रसंगी युवा सेना वणी विधानसभा प्रमुख युवराज ठाकरे, युवा सेना शहर प्रमुख हिमांशू बोहरा, कुणाल लोणारे, सौरभ खडसे, अनुप चटप, गौरव मडावी तसेच युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा आणि पुस्तक वाटपातून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.

    आयोजकांच्या वतीने संदेश :

    "वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला काहीतरी देण्याची संधी आहे. एक झाड म्हणजे भविष्यातील श्वास आणि एक पुस्तक म्हणजे उज्ज्वल भविष्याचा पाया. चला, प्रत्येक वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करून पर्यावरण संरक्षण, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी जपूया. हीच पालकमंत्री मा. संजयजी राठोड यांना खरी वाढदिवसाची शुभेच्छा!"

    Photo