विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी / कायर : जि. प. वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा, कायर येथे शैक्षणिक सत्र 2026-27 च्या प्रवेशोत्सवानिमित्त प्रवेशोत्सव मेळावा क्र. 2 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचवेळी विद्यार्थ्यांच्या आधुनिक शिक्षणासाठी सुसज्ज करण्यात आलेल्या डिजिटल खोलीचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटक व शैक्षणिक साहित्य वितरक म्हणून उपसरपंच सौ. मायाताई मोहुर्ले, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. निलोफर पठाण, ग्रामपंचायत सदस्य श्री. राकेशजी मामीडवार, केंद्रप्रमुख श्री. गजानन भगत तसेच मुख्याध्यापक श्री. राजेश खुसपुरे उपस्थित होते.
यावेळी श्री. किशोर कोट्टी, श्री. जनार्दन हालगरे, कु. सोनाली टोंगे, श्री. अमर मडावी, कु. श्रुतिका फटाले, श्री. षण्मुख सिडाम आणि श्री. युवराज बेंदवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री. गजानन भगत यांनी केले, तर मुख्याध्यापक श्री. राजेश खुसपुरे यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमर मडावी यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. प्रवेशोत्सव आणि डिजिटल खोलीच्या उद्घाटनामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.




