विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी: दि. ३० जून ला वणी येथील वणी पब्लिक स्कूलमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या निमित्ताने प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. नवागत विद्यार्थ्यांचे टिळा लावून, पुष्प व चॉकलेट देत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त शाळा परिसरात ५६ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. संत खेमराजजी महाराज यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शाळेच्या प्राचार्या जेनेकर मॅडम, जेष्ठ शिक्षक बावीस्कर सर, संस्थेचे सदस्य विक्रांत जी चचडा , शिक्षकवृंद


