ठळक बातम्या

    लोकमान्य टिळक महाविद्यालयात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : सध्याच्या धकाधकीच्या, प्रदूषण युक्त वातावरणात आणि मोबाईल संगणकाच्या सातत्यपूर्ण उपयोगाने अत्यंत नाजूक असणाऱ्या मानवी नेत्रांचे आरोग्य हा दिवसेंदिवस अधिकच काळजीचा विषय होत असून देखील सामान्य माणसाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष ही खरोखरच अत्यंत चिंतेची गोष्ट आहे हे लक्षात घेता लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या द्वारे नेत्र तपासणी चे भव्य आणि निःशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

                लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या सभागृहात १० जून २०२६ बुधवार रोजी जागतिक दृष्टिदान दिनाच्या निमित्ताने सकाळी ९ ते ११ या वेळात संपन्न होणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या हस्ते संपन्न होईल.

               वणी येथील ख्यातनाम नेत्र चिकित्सक डॉ. अनिकेत दिलीप अलोणे यांच्याद्वारे अत्याधुनिक यंत्र साधनांच्या माध्यमातून ही नेत्र तपासणी केली जाणार आहे.

             वणीकर जनतेने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रसाद खानझोडे तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. नीलिमा दवणे आणि डॉ. विकास जुनगरी यांच्या वतीने करण्यात येत आहे.




    Photo