ठळक बातम्या

    वणीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा होणार; २१ जून रोजी पोलीस स्टेशनसमोरील मैदानावर सामूहिक योगाभ्यास

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवारी, दि. २१ जून २०२६ रोजी वणी येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ५.४५ ते ९.०० वाजेदरम्यान पोलीस स्टेशन वणी समोरील मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    "योगा फॉर हार्मनी अँड पीस" या संकल्पनेवर आधारित यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागरिकांना योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध योग संस्थांच्या सहकार्याने सामूहिक योगाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, तणाव कमी होतो आणि जीवनशैली निरोगी राहते, असा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.

    या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासन, महाराष्ट्र योग शिक्षक संघ तसेच विविध सामाजिक व योग संस्थांचे सहकार्य लाभले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी यांच्यासह अनेक योग प्रशिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार आहेत.

    आयोजकांनी वणी शहर व परिसरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग दिन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

    संदेश :

    "योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, आनंदी आणि संतुलित जीवनाचा मार्ग आहे. दररोज काही मिनिटे योगासाठी दिल्यास आरोग्य, मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते."

    Photo