विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी शहराच्या वतीने शनिवारी (दि. २१ जून २०२६) भव्य योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
हे योगशिबिर सकाळी ५.४५ ते ७.०० या वेळेत वणी येथील एस. बी. लॉन येथे आयोजित करण्यात आले असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार श्री. संजीवरेड्डी बोदकुरवार राहणार आहेत.
या उपक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी, वणी शहर यांच्या वतीने करण्यात आले असून, संयोजक म्हणून प्रा. महादेव खाडे, सह-संयोजक सौ. रिता पहापळे व श्रीमती वैशाली वातीले यांची भूमिका राहणार आहे. तसेच वणी शहर भाजप अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडणार आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व लक्षात घेता नागरिकांनी आपल्या आरोग्यासाठी योगाचा अंगीकार करावा आणि या भव्य योगशिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

