ठळक बातम्या

    राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : येथील राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते, राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अभय पारखी हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अनीता टोंगे मॅडम उपस्थित होत्या.

    यावेळी अनीता टोंगे यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याचा, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या मोलाच्या योगदानाचा तसेच राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि शिक्षणाविषयीच्या त्यांच्या विचारांचा सविस्तर परिचय करून दिला. टिळकांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेची भावना जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय पारखी यांनीही विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक यांच्या विचारांचे अनुकरण करून प्रामाणिकपणे शिक्षण घेण्याचा संदेश दिला.

    कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तुषार घाने यांनी केले, तर प्रतीश लखमापुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यार्थी व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

    Photo