ठळक बातम्या

    मेंढोलीचे ज्येष्ठ कृषी उद्योजक तथा गुरुदेव प्रेमी श्री. देविदासजी ढवस यांचे निधन; परिसरात हळहळ

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी/मेंढोली : मेंढोली येथील ज्येष्ठ कृषी उद्योजक, गुरुदेव कृषी केंद्रचे संचालक तथा गुरुदेव प्रेमी म्हणून परिचित असलेले श्री. देविदासजी ढवस यांचे आज, दि. २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नागपूर येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मेंढोलीसह परिसरात शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    श्री. ढवस हे शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे, कृषी क्षेत्रात मार्गदर्शन करणारे आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने कृषी क्षेत्रासह सामाजिक व धार्मिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

    त्यांचा अंत्यविधी उद्या, दि. २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मेंढोली येथे होणार आहे.

    भावपूर्ण श्रद्धांजली!

    ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि दुःखाच्या या प्रसंगी ढवस परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    Photo