ठळक बातम्या

    *वणी–यवतमाळ मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी* *मुख्य रस्त्यावरील उभे असलेले ओव्हरलोड वाहने व वाहतूकीवर प्रतिबंध लावण्यात यावा..*

     *उद्या जर मुख्यरस्त्यावर उभे असलेल्या वाहनामुळे अपघात झाला तर कोल डेपो मालकवर व कोल वॉशरी मालकावर मनुष्यवधा चा गुन्हा दाखल करायचा काय?*

    *प्रवीण खानझोडे* 

    प्रमुख लढा संघटना वणी*

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : वणी यवतमाळ मुख्य मार्गावरील रुखमाई कोल वॉशरी परिसर तसेच राजूर रिंग रोड ते  वंदना ट्रान्सपोर्ट कंपनी   कळमना फाट्या पर्यंत व लालपलिया पर्यंत सध्या अपघात प्रवण ठिकाण बनले असून येथे वारंवार लहान-मोठे अपघात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर लढा संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग, वणी यांना निवेदन सादर करण्यात आले.

    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या मार्गावर कोळशाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात सतत ये-जा सुरू असते. तसेच अनेक ट्रक ओव्हरलोड अवस्थेत धावत असल्यामुळे त्यावरील ताडपत्री व्यवस्थित बांधलेली नसते. त्यामुळे कोळसा व इतर साहित्य रस्त्यावर सांडून दुचाकीस्वारांसह इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.

    याशिवाय संबंधित ठिकाणी दिशादर्शक फलक, सावधानता फलक, रिफ्लेक्टर, स्पीड ब्रेकर किंवा रंबल स्ट्रिप्स नसल्यामुळे अपघातांचा धोका अधिक वाढला आहे.

    लढा संघटनेने प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत:

    रुखमाई कोल वॉशरी व राजूर रिंग रोड परिसरात "अपघातप्रवण क्षेत्र", "वेग मर्यादित ठेवा", "सावकाश वाहन चालवा" असे फलक तातडीने बसविण्यात यावेत.

    आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर, स्पीड ब्रेकर अथवा रंबल स्ट्रिप्स बसविण्यात याव्यात.

    ओव्हरलोड वाहनांवर कठोर कारवाई करून वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.

    लढा संघटनेने प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मागण्यांची त्वरित पूर्तता न झाल्यास संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.निवेदन देते वेळी 

    लढा संघटनाचे प्रमुख प्रवीण खानझोडे,ऍड रुपेश ठाकरे सरपंच मुंगोली आशिष रिंगोले, जफार खान वणी, प्रताप मुन, मनोज ढेंगळे, सुभाष लसंते, रोशन गारपेल्लीवर आकाश दुबे, सुरेश नेहारे  उपस्थित होते...

    Photo