ठळक बातम्या

    खाती चौकात प्रवासी ॲपे ऑटो पलटी; शाळकरी मुलगी थोडक्यात बचावली, चालक जखमी

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी  : वणी शहरातील गजबजलेल्या खाती चौक परिसरात शनिवारी (दि. २५ जुलै) दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास प्रवासी ॲपे ऑटो (क्र. MH-29 T 8030) पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात एका शाळकरी मुलीचा थोडक्यात जीव वाचला असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, खाती चौक हा वणी शहरातील प्रमुख बाजारपेठेचा चौफुली चौक असून येथे नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. दुपारी एक शाळकरी मुलगी अचानक ऑटोसामोर आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ऑटो रस्त्यालगत असलेल्या कैलास हॉटेलसमोर पलटी झाला.

    या अपघातात कैलास हॉटेलच्या मालमत्तेचे नुकसान झाले. ऑटो पलटी झाल्यानंतर चालक वाहनाखाली अडकला होता. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन चालकाला बाहेर काढले. चालकाला किरकोळ मार लागला असून, घटनास्थळी काही नागरिकांकडून चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा करण्यात येत होती. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

    दरम्यान, या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. कैलास हॉटेलचे मालक या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळाली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

    Photo