सहकार क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि समाजसेवेचा नवा अध्याय
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी, दि. २४ जुलै : अद्विता अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, यवतमाळ च्या वणी शाखेचा उद्घाटन सोहळा शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास उद्घाटक म्हणून भाजप जिल्हा समन्वयक (पुसद-यवतमाळ) मा. श्री. नितीनजी भुतडा तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार मा. श्री. संजीव रेड्डी बोदकुलवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय सौ. विधाताई आत्राम (नगराध्यक्षा वणी ) श्री विजयबाबु चोरडिया ( शिवसेना नेते यवतमाळजिल्हा), श्री. राजुभाऊ उंबरकर, (मनसे नेते), श्री. देविदासजी काळे,( रंगनाथ स्वामी पतसंस्था वणी) श्री संजयजी खाडे, ( चेअरमन, ( जय जगन्नाथ सोसायटी, वणी), श्री चंद्रशेखरजी खोंड, ( केशव नागरी पतसंस्था, वणी), श्री. पवनजी एकरे, (जिल्हाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा, यवतमाळ ), shree mahesh dethe maji sanchlk krushi utpana bajar samitiश्री. उमेशजी काळे, (युनिक अर्बन सोसायटी,नागपूर ), श्री. रवीजी चहांदे (चेअरमन, ब्रह्मपुरी अर्बन सोसायटी, चंद्रपूर), श्री. नितीनजी ठाकरे (चेअरमन, कामठी महिला अर्बन सोसायटी, नागपूर), श्री. दीपक दिकुंडवार (मुख्य कार्यकारी अधिकारी, केशव नागरी सहकारी पतसंस्था, वणी), मा. श्री. प्रफुल्लजी जानोलकर (चेअरमन, बालाजी इंटेरियर्स, अमरावती), मा. श्री. किरणजी क्षीरसागर (पीओसीट सॉफ्टवेअर, नागपूर), मा. श्री. सचिनजी पत्की (सर्वत्र टेक्नॉलॉजी, नागपूर), श्री. अनिलजी आक्केवार (जिल्हा उपाध्यक्ष, सहकार भारती), तसेच युवा उद्योजक श्री. अंकुश bodhe यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. नितीनजी भुतडा यांनी सहकार क्षेत्रातील बदलती परिस्थिती, आर्थिक संस्थांसमोरील आव्हाने आणि त्यावर मात करण्यासाठी पारदर्शक कारभार, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, गुणवत्तापूर्ण सेवा व सभासदांचा विश्वास जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाभिमुख कार्यातूनच सहकारी संस्था दीर्घकाळ टिकून एक नवा आदर्श निर्माण करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मा. श्री. संजीव रेड्डी बोदकुलवार यांनी आपल्या मनोगतात अद्विता अर्बन मल्टीस्टेटची स्थापना ही केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून गरजू नागरिक, युवा उद्योजक, नवतरुण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्याच्या व्यापक सामाजिक उद्देशाने करण्यात आल्याचे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अतुलजी वाकोडे यांच्या दुरदृष्टीचे कौतुक करत त्यांनी संस्थेच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री. अतुलजी वाकोडे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या स्थापनेमागील उद्दिष्टे, भावी विस्तार योजना तसेच सभासदांना अत्याधुनिक, सुरक्षित व विश्वासार्ह आर्थिक सेवा देण्याकरीता संस्था सदैव कार्यतत्पर आहे. तसेच ईतरही बाबतीत संस्थेच्या बांधिलकीची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विहार मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. अश्विनी आक्केवार यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्यास वणी शहर व परिसरातील नागरिक, सभासद, ग्राहक, हितचिंतक, उद्योजक तसेच सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या शाखेला शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे मुख्य कार्यालयातील अधिकारी श्री. उमेशजी जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक श्री. चंद्रशेखर धकाते, शाखाधिकारी श्री. पवन भास्करवार, जनरल मॅनेजर श्री. फैयाज देशमुख तसेच संस्थेचे सन्माननिय संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वणी शाखेच्या उद्घाटनामुळे परिसरातील नागरिकांना आधुनिक, पारदर्शक, विश्वासार्ह आणि ग्राहकाभिमुख आर्थिक सेवा उपलब्ध होणार असून सहकार क्षेत्रात अद्विता अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची वाटचाल अधिक वेगाने आणि भक्कमपणे पुढे जाईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.











