ठळक बातम्या

    लढा संघटना चे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन

     वणी शहरातील अनियंत्रित वाहतूक, चौकाचौकात करण्यात आलेले अनधिकृत वाहन थांबे व बेकायदेशीर पार्किंग हटवून वाहतूक सुरळीत करण्यात यावी...

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी: वणी शहरामध्ये व परिसरातील मुख्य मार्गानी दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, बसस्थानक परिसर तसेच मुख्य रस्त्यांवर ऑटो,  ट्रॅव्हल्स व इतर वाहने प्रवासी वाहने व इतर वाहनांचे अनधिकृत थांबे करण्यात आले आहेत. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

    शाळा, महाविद्यालये, रुग्णालये व शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना तसेच रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांनाही अडथळा निर्माण होत आहे. अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चौकांमध्येच वाहने उभी करतात, त्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

    त्यामुळे खालील मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी 

    वणी शहरातील सर्व अनधिकृत वाहन थांबे तात्काळ हटविण्यात यावेत.

    चौकाचौकात वाहतूक पोलीसांची नियमित नियुक्ती करण्यात यावी.

    बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

    शहरातील ऑटो व प्रवासी वाहनांसाठी अधिकृत थांबे निश्चित करून त्यांचे स्पष्ट फलक लावण्यात यावेत.

    वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नियमित विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात यावी.

    मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही व वाहतूक नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था करण्यात यावी.

    वणी शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा व सार्वजनिक हिताचा विचार करून वरील मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. 

    अन्यथा लढा संघटनाच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी यावेळी लढा संघटनाचे प्रमुख प्रवीण खानझोडे, आकाश दुबे जफर खान, अशोक अंकतवार  सुभाष लसंत्ते  तानबाजी  कडू  हे उपस्थित होते

    Photo