वणी/झरी : सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे, गावाच्या विकासासाठी संघर्ष करणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून मा. आशिष भाऊ खुळसंगे यांची ओळख निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत विविध पदांवर काम करताना त्यांनी विकासाभिमुख आणि जनहिताची भूमिका कायम ठेवली.
आशिष भाऊ खुळसंगे यांनी गणेशपूर (खु.)चे सरपंच म्हणून 2005 ते 2009 आणि पुन्हा 2009 ते 2012 या कालावधीत कार्य केले. त्यानंतर 2012 ते 2017 या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून ग्रामीण भागातील विकासकामांना गती दिली. याच काळात ते जिल्हा नियोजन समिती सदस्य (2013-2017) तसेच रुग्ण कल्याण समिती, झरीचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते.
राजकीय कारकिर्दीत त्यांनी युवा सेना उपजिल्हाप्रमुख (2013-2018) म्हणून युवकांना संघटित केले. त्यानंतर झरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (2019-2025) म्हणूनही जबाबदारी सांभाळली. दि. वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी, वणी-झरी-मारेगावचे अध्यक्ष (2022-2026) म्हणून कार्यरत होते. आता संचालक असून शेतकरी हितासाठी विविध उपक्रम राबवत आहेत.
2024 मध्ये 'शेतकरी न्याय यात्रा'चे प्रणेते म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलन उभे केले. सामाजिक बांधिलकी जपत 2013 मध्ये मुकुटबन येथील दोन अनाथ मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला.
शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळाल्याची भावना अनेक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. शांत, संयमी, सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणारे नेतृत्व म्हणून आशिष भाऊ खुळसंगे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
युवा सेनेचे लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा यांनीही आशिष भाऊ खुळसंगे यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मते, "आशिष भाऊ यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळाली तर आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. संजू भाऊ राठोड आणि विश्वास भाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राजकीय वाटचाल घडवली असून आम्हालाही त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे."
सध्या झरी-वणी-मारेगाव परिसरात आशिष भाऊ खुळसंगे यांचे वाढते जनसंपर्क, विकासाभिमुख भूमिका आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे ते भविष्यातील प्रभावी नेतृत्व म्हणून चर्चेत आहेत. कार्यकर्त्यांमध्येही त्यांना पक्ष संघटनेत अधिक मोठी जबाबदारी मिळावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
वणी विधानसभा मतदारसंघात माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना नेते आशिष भाऊ खुळसंगे यांना पक्षात लवकरच मोठी जबाबदारी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यांच्या जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि विविध सामाजिक प्रश्नांवरील सक्रिय भूमिकेमुळे कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांचे मत आहे की, पक्षाने आशिष भाऊ खुळसंगे यांना त्यांच्या कार्याची दखल घेत लवकरच मोठी संघटनात्मक जबाबदारी द्यावी. आता पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण वणी विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.





