ठळक बातम्या

    आज डॉ. स्वानंद पुंड दूरदर्शनवर.

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी  :  वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील संस्कृत विभाग प्रमुख तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यासक्रम मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष विद्यावाचस्पती प्रा.स्वानंद गजानन पुंड यांची आगामी संस्कृत सप्ताह आणि संस्कृत दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली विशेष मुलाखत दूरदर्शनच्या हॅलो सह्याद्री या विशेष कार्यक्रमात आज शुक्रवार दिनांक ३१ जुलै रोजी दुपारी १२ वाजता आणि पुन:प्रसारण स्वरूपात रात्री ११ वाजता प्रसारित होणार आहे. 

            संस्कृत भाषा परंपरा, वर्तमान आणि भविष्य या शीर्षकाने दूरदर्शनचे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक तथा मुलाखतकार डॉ. विवेक अलोणी यांनी ही मुलाखत घेतली असून दूरदर्शन केंद्राच्या मीनल पाठराखे या कार्यक्रमाच्या निर्मात्या आहेत. 

    संस्कृत भाषेचे स्वरूप , वैभव, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तिचे असणारे महत्त्वपूर्ण स्थान, सध्याच्या काळात सर्वसामान्यांच्या जीवनात संस्कृतचे असणारे महत्त्व, संस्कृत प्रचारासाठी कार्य करणाऱ्या संस्था, त्यांचे विशेष उपक्रम, संस्कृत चा अंगीकार आणि प्रचार प्रसारासाठी आपण काय करू शकतो? अशा विविध विषयांवर मुद्देसूद विवेचन करणाऱ्या या मुलाखतीत डॉ. स्वानंद पुंड यांच्याद्वारे साकारण्यात आलेला गीर्वाण वाणी हा अभिनव उपक्रम तथा त्या आधारे निर्माण झालेले अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असणारे आणि जगातील हजारो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले अभ्यासक्रम या सगळ्यांच्या बद्दल सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. 

    संस्कृत बद्दल आस्था असणाऱ्या समस्त संस्कृत प्रेमींनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा.

    Photo