ठळक बातम्या

    माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा ६४ वा वाढदिवस ६४ वृक्ष लागवडीने साजरा

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री तथा आमदार श्री ,सुधीर मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त गुरुवार (दि. ३० जुलै) रोजी वणी बसस्थानक परिसरात ६४ वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. "एक वृक्ष लावूया, पर्यावरण वाचवूया" या संकल्पनेतून कडुलिंब, जारूड, कांचन, शिशु, बॉटल ब्रश, करंज आदी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

    या वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर व सौ. उमा विजय पिदुरकर यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांच्या हस्ते करण्यात आले.

    यावेळी महादेव खाडे, दिनकरराव पावडे, संजय पिंपळशेंडे, ॲड. निलेश चौधरी, रवी बेलूरकर, सौ. मीराताई पोतराजे, प्रदीप जेऊरकर, सौ. मंगलाताई पावडे, सौ. उमाताई पिदुरकर, नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, राकेश बूगेवार, लवलीलाल भैया, अनिल चिंडालिया, लक्ष्मण उरकुडे, मनोज डंभारे, दीपक मत्ते, महेश देठे, हितेन अटारा तसेच भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले. "प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे," असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला.

    Photo