ठळक बातम्या

    शिवसेनेत आशिष खुलसंगे यांना मोठी जबाबदारी; यवतमाळ जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती

     शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार आणि पक्षसंघटन मजबूत करण्याची जबाबदारी

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी : शिवसेनेच्या केंद्रीय कार्यालयाकडून यवतमाळ जिल्हा क्षेत्रासाठी महत्त्वाची संघटनात्मक नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. ही नियुक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आशिष खुलसंगे यांना नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली आहे.

     

    शिवसेना पक्षाचे सचिव संजय पुष्पलता मोरे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या नियुक्ती पत्रानुसार आशिष खुलसंगे यांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    नियुक्तीपत्रात आशिष खुलसंगे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा सक्रियपणे प्रचार-प्रसार करावा आणि पक्षवाढीसाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन अधिक बळकट करण्यासाठी काम करावे, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.

    या नियुक्तीमुळे वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असून युवा सेना, महिला आघाडी तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आशिष खुलसंगे यांच्या नियुक्तीचे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    आशिष भाऊ खुलसंगे यांच्या नियुक्तीने शिवसेनेला नवी ऊर्जा – विक्रांत चचडा

    माननीय आशिष भाऊ खुलसंगे यांची शिवसेना  जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल विश्ववासू युवा सेनेचे लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, आशिष भाऊ यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून जिल्ह्यात संघटना अधिक जोमाने विस्तारेल. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक सक्षम व जनाधार वाढवणारी ताकद म्हणून पुढे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



    Photo