ठळक बातम्या

    लोकमान्य टिळक महाविद्यालय एक शाम रफी के नाम संपन्न.

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी  : सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री मोहम्मद रफी यांच्या ४६ या स्मृती दिनाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक महाविद्यालय  आणि फ्रेंडस् म्युझिकल ग्रुप वणी यांच्या संयुक्त विद्यमाने " एक शाम रफी के नाम " हा मोहम्मद रफी यांच्या गाण्यांना समर्पित कार्यक्रम सादर करण्यात आला. 

           याप्रसंगी अध्यक्ष स्थानी लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार विवेक पांडे आणि विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड उपस्थित होते.

           संतोष जोशी यांनी प्रास्ताविकामध्ये वणीतील संगीत रसिकांच्या सेवेसाठी हा कार्यक्रम असल्याची भूमिका स्पष्ट केली.

           रफी आपल्याला सोडून गेल्यानंतर आज इतक्या वर्षानंतरही त्यांच्या गाण्यांनी आपल्या मनावरची मोहिनी कायम आहे यातच त्यांचे खरे कर्तृत्व दिसूण येते अशा शब्दात स्वानंद पुंड यांनी भावना व्यक्त केल्या. नायब तहसीलदार विवेक पांडे यांनी मोहम्मद रफी यांच्या गाण्यांच्या विविध वैशिष्ट्यांना अधोरेखित केले. 

             नियमित शिक्षणासोबतच समाजामध्ये साहित्य आणि संगीताची आवड निर्माण करावी ही महाविद्यालयाची भूमिका आहे. समाजात जे जे उत्तम होते त्यामध्ये आपला सहभाग असावा या दृष्टीने हा महाविद्यालयाचा प्रयास आहे असे विचार अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रसाद खानझोडे यांनी व्यक्त केले.

         यानंतर सादर झालेल्या संगीत कार्यक्रमात गणेश वंदना (सविताताई डोर्लीकर)

    शोधीशी मानवा राउळी मंदिरी

    (विवेक पांडे ) आदमी मुसाफिर हे ( प्राचार्य प्रसाद खानझोडे )

    मोहम्मद रफी तू बहोत याद आया (दिगंबर ठाकरे )ये रेशमी जुल्फे

    (संतोष जोशी )जनम जनम का साथ है हमारा तुम्हारा ( जयप्रकाश सुर्यवंशी सर  सारिका चांदेकर ) सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था .. (अरूण डवरे,  सारिका चांदेकर) पत्थर के सनम तुझे हमने (शेख रफीक)

    चलो रे डोली उठाओ कहार (शफी खान साहब)

    वादा करले साजना ( दिगंबर ठाकरे , सारिका चांदेकर ) 

    दिवाने है दिवानो को ना घर(संतोष जोशी, सारिका चांदेकर) वादियाँ मेरा दामन

    (अरुण डवरे ) क्या हुआ तेरा वादा

    (जयप्रकाश सूर्यवंशी )तेरे हाथो मे पहना के चुडीयाँ (शेख रफीक, सारिका चांदेकर) चाहूंगा मैं तुझे सांझ स्वेरे (समशेर हुसैन)

    फिरकी वाली तू कल फिर आना

    (दिगंबर ठाकरे ) इतना तो याद है मुझे (संतोष जोशी  डॉ.संचिता नगराळे ) ऐसा मौका फिर कहा मिलेगा ( शेख रफीक) मुझे तेरी मुहब्बत का सहारा मिल गया होता (महेश जोशी) में कही कवी ना बन जाउ (अरुण डवरे )छुप गये सारे नजारे (जयप्रकाश सूर्यवंशी,सारिका चांदेकर)

    तुम मुझे यु भुला ना पाओगे

    (संतोष जोशी) रिमझिम के सावन ( संतोष जोशी, सविता डोरलीकर ) अशा स्वरूपात विविध गीतांच्या माध्यमातून रफींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

    श्री महेश जोशी यांनी स्त्री आणि पुरुष या दोन्ही आवाजात सादर केलेल्या गाण्याने श्रोत्यांना विशेष आनंद प्रदान केला.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयप्रकाश सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन दिगंबर ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संगीत संयोजन अभिलाष राजूरकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सविता डोरलीकर तथा अरुण डवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

    Photo