विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : येथील ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव समिती’ची महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२६ रोजी निवर्तमान अध्यक्ष ॲड. कुणालबाबू चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीत वर्ष २०२६-२७ करिता निवर्तमान अध्यक्ष ॲड. श्री. कुणाल विजय चोरडिया यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवत त्यांची अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
त्यानंतर नवनियुक्त अध्यक्षांच्या अनुमतीने व सभेच्या सर्वानुमते उत्सव समितीची वर्ष २०२६-२७ ची नूतन कार्यकारिणी व वरिष्ठ सल्लागार समिती जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणी (२०२६–२७) :
अध्यक्ष : ॲड. श्री. कुणाल विजय चोरडिया
उपाध्यक्ष : श्री. शुभमजी मदान, श्री. श्याम लाहारिया
कार्याध्यक्ष : श्री. राहुलभाऊ मुंजेकर
सहकार्याध्यक्ष : श्री. अभय नागतुरे
सचिव : श्री. उमेशबाबू पोद्दार
सहसचिव : श्री. सुधीरभाऊ तालसे
कोषाध्यक्ष : श्री. जयंत पांडे
सहकोषाध्यक्ष : श्री. राजू रिंगोले
संयोजक : श्री. अमोल धानोरकर
प्रसिद्धी प्रमुख : श्री. आशिषजी सिसोदिया (जैन)
सहप्रसिद्धी प्रमुख : श्री. दीपकजी पाऊणकर
सोशल मीडिया प्रमुख : श्री. पार्थजी त्रिवेदी
प्रिंट मीडिया प्रमुख :श्री. सौरभ राजुरकर
वरिष्ठ सल्लागार समिती :
श्री. विजयजी चोरडिया, श्री. आशिषजी गुप्ता, श्री. निकेतजी गुप्ता, श्री. विजयजी पुण्यानी, श्री. दिवानजी फेरवानी, श्री. मूलचंदजी जोशी, श्री. राजाभाऊ बिलोरिया, श्री. महावीरजी कटारिया, श्री. नारायणभाऊ गोडे, श्री. सुरेशजी मांडवकर, श्री. संतोषजी मार्कंडे, श्री. अनिलजी रेभे, श्री. विशालभाऊ दूधबडे, श्री. गजाननजी बत्तुलवार, श्री. पिंकीजी बत्रा, प्रा. श्री. दिलीपजी अलोणे आणि श्री. मयूरजी गेडाम.
त्रिदिवसीय कार्यक्रमांचे नियोजन व महिला समितीची नृत्य स्पर्धा :
या बैठकीत आगामी त्रिदिवसीय जन्माष्टमी महोत्सवाच्या रूपरेषेवर सविस्तर चर्चा करण्यात येऊन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे व भव्य रॅली चे आयोजन निश्चित करण्यात आले. महोत्सवाच्या चोख व नेटके नियोजनासाठी विविध उपसमित्यांची घोषणा करण्यात आली.
उत्सवाचे दरवर्षीचे मुख्य आकर्षण असलेली ‘भव्य नृत्य स्पर्धा’ यावर्षीही ‘जय श्रीकृष्ण जन्माष्टमी महिला समिती’च्या वतीने अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. विशाल दूधबडे यांनी केले. बैठकीस समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


