ठळक बातम्या

    *वणी येथे आझादी की दौड स्पर्धेचे भव्य आयोजन*

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी: विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक क्षमतांची निर्मिती आणि विकास करण्यासाठी तसेच त्यांच्या क्रीडा गुणांना यथोचित वाव मिळावा यासाठी वणी येथील शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा क्रीडा विभाग, स्वावलंबी शिक्षण संस्था वणी संचालित सुशगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने  राष्ट्रीय क्रीडा  दिनाचे औचित्य साधून शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी विदर्भ स्तरीय आझादी की दौड़ या वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

             ही स्पर्धा सोळा वर्षा वरील मुले आणि मुली तसेच सोळा वर्षा  खालील मुले आणि मुली अशा चार गटांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. यातील सोळा वर्षावरील गटासाठी पाच किलोमीटर तर सोळा वर्षाखालील गटासाठी तीन किलोमीटर अंतर निश्चित करण्यात आले आहे.

             ‌ वरिष्ठ गटात म्हणजे सोळा वर्षावरील मुले आणि मुली या दोन्ही गटांतील प्रथम पाच विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५०००, ४०००, ३०००,२००० आणि १००० तर बारा वर्षावरील आणि सोळा वर्षाखालील मुले आणि मुली या दोन्ही गटात अनुक्रमे ३०००, २५००,२०००,१५०० आणि १००० अशा भरघोस रोख रकमेसह आकर्षक सन्मानचिन्ह , पदक आणि प्रमाणपत्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार, सुशगंगा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार, लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत वितरित करण्यात येईल. 

            स्पर्धेत सहभागी सर्वच धावपटूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेसाठी प्रत्येकी ५० रुपये प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

            २५ ऑगस्ट २०२६ पर्यंत या स्पर्धेसाठी विदर्भातील सर्व भागातून नामांकन नोंदणी करता येईल.

            २८ ऑगस्ट रोजी दुपारी बारानंतर स्पर्धकांना लोकमान्य टिळक महाविद्यालयात मेडिकल सर्टिफिकेट, वयाचा पुरावा सादर करून आणि नोंदणी शुल्क भरून आपला धावक क्रमांक प्राप्त करता येईल.

     शनिवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी ठीक सात वाजता लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून स्पर्धेला आरंभ होईल

             या स्पर्धेत भाग घेणारा धावपटू विदर्भातील असणे आवश्यक आहे. तसेच त्याला त्यादिवशी सकाळी सहा वाजता स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित राहणे अनिवार्य असेल.

                स्पर्धेतील नियम अटी किंवा अन्य कोणत्याही अधिक माहिती साठी प्रा.कमलेश बावणे-9370616279 प्रा.गौतम जीवने

    8856985434 तथा प्रा.अजय राजुरकर

    8669130089 यांच्यासोबत संपर्क करावा तथा विदर्भातील अधिकाधिक धावपटूंनी या स्पर्धेत उस्फूर्त प्रतिसाद घ्यावा असे आवाहन लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे क्रीडा आणि शारीरिक शिक्षण विभाग संयोजक प्रा. उमेश व्यास यांच्या वतीने करण्यात येत आहे.

    Photo