मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची विशेष उपस्थिती; वणीच्या छत्रपती ढोल-ताशा पथकाचे ६० वादक सहभागी होणार
विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
नागपूर : जनमंथन फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘मंथन 4 युवा – नागपूर 2026’ या भव्य उपक्रमांतर्गत ढोल-ताशा पथकांचा महासोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात तब्बल ४५०० वादकांचा सहभाग राहणार असून, महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीचा दिमाखदार आविष्कार यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे.
या भव्य कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या महासोहळ्यात वणीच्या छत्रपती ढोल-ताशा पथकातील तब्बल ६० वादक सहभागी होणार आहेत. पथक प्रमुख दिपक पाऊणकर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती ढोल-ताशा पथक वणी नागपूरच्या या भव्य महासोहळ्यात आपली कला सादर करणार आहे.
रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता, नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे.
ढोलांचा निनाद, ताशांचा गजर आणि भगव्या ध्वजांच्या दिमाखात वणीच्या ६० वादकांचा सहभाग हा या महासोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची विशेष उपस्थिती आणि हजारो वादकांचा एकत्रित नाद यामुळे हा सोहळा निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.
‘ढोलांचा नाद घुमणार, ताशांचा गजर होणार… आणि विदर्भाची सांस्कृतिक ताकद नागपूरच्या भूमीवर अनुभवायला मिळणार!’


