विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या स्वरूपात मांडलेल्या ६४ कला म्हणजे शिक्षण पद्धतीचे जणू काही ६४ स्तंभ होते. आज कौशल्य विकास या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणे ज्या गोष्टीकडे पाहायला शिकवते ती भूमिका या ६४ कलांमध्ये भारतीय संस्कृतीने हजारो वर्षांपासून जोपासली आहे.
मात्र दुर्दैवाने आजच्या नवीन पिढीला या ६४ कलांची नावे देखील माहिती नाहीत. यावर कृतिशील उपाय म्हणून संस्कृत भारती शाखा वणी आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयाचा संस्कृत विभाग यांच्या वतीने संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाच ते सात या वेळामध्ये स्थानिक जैताई देवस्थानच्या सभागृहात ६४ कला प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये आपल्याला त्या सर्व कलांची नावे, त्यांचे नेमके स्वरूप स्पष्ट करणारी चित्रे आणि त्याविषयी थोडक्यात माहिती अशा गोष्टी प्राप्त होतील.
वणीकर संस्कृत आणि संस्कृती प्रेमींनी या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

