ठळक बातम्या

    *शनिवारी जळका येथे वक्तृत्त्व आणि लेखन कौशल्य कार्यशाळा* साहित्यिक, संपादक तथा वक्ते सुनील इंदुवामन ठाकरे करतील मार्गदर्शन

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    मारेगाव: जळका येथील स्वर्गीय लक्ष्मीबाई मोघे विद्यालयात शालेय उपक्रमाचा भाग म्हणून वकृत्त्व आणि लेखन कौशल्य कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही कार्यशाळा शनिवार, २९ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता शाळेच्या सभागृहात पार पडणार आहे. या कार्यशाळेत ख्यातनाम साहित्यिक, वक्ते, संपादक सुनील इंदुवामन ठाकरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

    ठाकरे हे गेल्या तीन दशकांपासून पत्रकारिता, ग्रंथ संपादन,  स्तंभलेखन आदी क्षेत्रांत कार्यरत आहेत. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. किशोर मोघे ह्यांच्या मार्गदर्शनात विश्वस्त प्रा. कुंतलेश्वर तुरविले, मुख्याध्यापक सुरेश नहाते आणि शिक्षक तथा पत्रकार देवेंद्र पोल्हे ह्यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.



    Photo