ठळक बातम्या

    लोकमान्य टिळक महाविद्यालयात ग्रंथपाल दिन संपन्न

     

    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी :  ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. सी. रंगनाथन् यांच्या जयंती निमित्ताने शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये सुभाषित लेखन स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना अभिनव श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

            याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अभिजित अणे, डॉ. स्वानंद पुंड तथा ग्रंथपाल डॉ गुलशन कुथे हे उपस्थित होते. 

            प्रास्ताविकामध्ये डॉ. गुलशन कुथे यांनी या दिनाचा इतिहास आणि महत्त्व स्पष्ट करून मानवी जीवनातील ग्रंथालयाचे स्थान विशद केले. सोबतच विद्यार्थ्यांना या संपन्न ग्रंथालयात सोबत जोडून घेण्यासाठी ही योजना असल्याचे स्पष्ट केले. 

             डॉ .स्वानंद पुंड यांनी आपल्या मार्गदर्शनात मानवी जीवनामध्ये संभाषण आणि लेखन यांचे वैशिष्ट्य अधोरेखित करीत ग्रंथ वाचन आणि त्यावरील लेखनाविषयी विद्यार्थ्यांना आवाहन केले 

           अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल आणि त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करीत ग्रंथालयाच्या विविध उपक्रमांचा आणि ग्रंथालयाचा लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले. 

          याप्रसंगी घेण्यात आलेल्या सुभाषित लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक, लक्ष्मी के. कुमार बी.एस्सी. तृतीय वर्ष

    ,द्वितीय क्रमांक, चांदनी जे. पानेरी,बी.कॉम. प्रथम वर्ष,तृतीय क्रमांक: अक्षरा एस. बल्लमवार बी.ए. प्रथम वर्ष तथा प्रोत्साहनपर पुरस्कार: खुशी तांबेरकर बी.ए. प्रथमवर्ष

    अशा विजेत्यांना ग्रंथ स्वरूप भेट देऊन गौरविण्यात आले. 

             या स्पर्धेचे स्वरूप आणि निकाल जयंत शेंडे यांनी सादर केला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आनंद नगराळे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष चांदेकर यांनी केले.

    Photo