विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
चंद्रपूर/भद्रावती : नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज भैया अहिर यांनी सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रपूर येथील प्रसिद्ध अंचलेश्वर मंदिर तसेच भद्रावती येथील भद्रनाग मंदिरात भक्तिभावाने पूजा-अर्चना केली.
भगवान शिवजी आणि नागदेवतेच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी सर्वांच्या सुख, शांती, समृद्धी व समाधानासाठी प्रार्थना केली. नागपंचमीच्या निमित्ताने मंदिर परिसरात भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी भाजप भद्रावती शहराच्या वतीने आयोजित साबुदाणा खिचडी वाटप कार्यक्रमात हंसराज अहिर यांनी सहभाग घेतला. त्यांनी भाविकांना स्वतः खिचडीचे वाटप करून नागपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.याप्रसंगी वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. करणजी देवतळे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.



