ठळक बातम्या

    निलजई येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखेचे उद्घाटन

     


    विदर्भ वार्ता । प्रतिनिधी 

    वणी ,निलजई : शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वणी विधानसभा मतदारसंघातील निलजई येथील शिवसैनिकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन शाखेची स्थापना केली. या शाखेच्या फलकाचे अनावरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा लोकसभा संपर्कप्रमुख मा.संजय देरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

    आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निलजई येथील या शाखेमुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होण्यास मदत होईल. यावेळी उपस्थित पदाधिकारी व शिवसैनिकांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसैनिकांचा उत्साह, निष्ठा आणि संघटनात्मक बांधिलकी हीच शिवसेनेची खरी ताकद असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

    या उद्घाटन सोहळ्यास श्री. संजयभाऊ निखाडे (जिल्हाप्रमुख), श्री. शरद ठाकरे (उपजिल्हाप्रमुख), श्री. संतोष कुचनकर (वणी तालुकाप्रमुख), श्री. संजयभाऊ जांभुळकर (शाखाप्रमुख), श्री. मंगेश तुरानकर (उपशाखाप्रमुख), श्री. आशिष आगरकर (सचिव), श्री. विनोदजी जांभुळकर (कोषाध्यक्ष), श्री. तिलक डोंगरे (सहसचिव), श्री. अनंता फुलगरे (संघटक), श्री. विनोद उ. जांभुळकर (सहसंघटक) यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

    निलजई येथील नवीन शाखेच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून आगामी काळात शिवसेनेचा जनाधार वाढविण्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

    Photo