विदर्भ वार्ता । प्रतिनिधी
वणी : शहरातील सुतारपुरा, नटराज चौक परिसरातील रहिवासी स्व. रामभाऊ रामकृष्ण झिलपे (वय ७४) यांचे मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच वणी शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास बाथरूममध्ये पडल्याने रामभाऊ झिलपे यांना दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
रामभाऊ झिलपे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे शहरातील विविध मेडिकल स्टोअर्समध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे विविध क्षेत्रातील नागरिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
त्यांच्या पार्थिवावर बुधवार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे तसेच बराच आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने झिलपे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
स्व.रामभाऊ रामकृष्ण झिलपे.... यांना
विदर्भ वार्ता पोर्टल न्यूज वणी परिवार कडून भावपूर्ण श्रद्धांजली

